Positive Story
शासनाचे बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमास दिनांक 22/01/2025 रोजी दहा वर्ष पूर्ण झाल्याने पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर कडून बेटी बचाव बेटी पढाव या रॅलीचे आयोजन करण्यात आले
शासनाचे बेटी बचाव बेटी पढाव या उपक्रमास दिनांक 22/01/2025 रोजी दहा वर्ष पूर्ण झाल्याने पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर कडील भरोसा सेल महिला सुरक्षा विशेष कक्ष सोलापूर शहर कडून आज दिनांक 04/02/2025 रोजी सकाळी 11 वाजता महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांचे बेटी बचाव बेटी पढाव या रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅलीस माननीय श्री.एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर यांनी हिरवा झेंडा दाखविल्यानंतर रॅलीची सुरुवात केली. सदर वेळी माननीय श्री अजित बोराडे पोलीस उपायुक्त सो. मुख्यालय माननीय डॉक्टर दिपाली काळे पोलीस उपयुक्त गुन्हे/ विशा. माननीय राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे महिला सुरक्षा विशेष कक्ष असे हजर होते ...Read More
शहरातील जड वाहतूक संदर्भात मा. पोलिस आयुक्त श्री एम राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली बैठक
दिनांक २७/०१/२०२५ रोजी १६ वा. पोलिस आयुक्तालय कार्यालय, सोलापूर शहर येथील मीटिंग हॉल मध्ये सोलापूर शहरातील जड वाहतूक संदर्भात मा. पोलिस आयुक्त श्री एम राजकुमार यांचे अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात अली होती, सदर बैठकीस जड वाहतूक असोसिएशन चे अध्यक्ष श्री. लक्ष्मण विटकर, पदाधिकारी व जवळपास १०० वाहन मालक, बिल्डर्स, कॉट्रॅक्टर उपस्थित होते… सदर बैठकीमध्ये मा. पोलिस आयुक्त सो यांनी खालील प्रमाणे सूचना दिल्या आहेत… १. वाहन मालक यांनी त्यांचे वाहनावर चालक म्हणून हुशार व ज्याला जड वाहन चालविण्याचा ५ वर्षांचा अनुभव आहे असा चालकाची नियुक्ती करण्यात यावी. २. शहरातील रस्त्यावर वाहनांचा वेग २० kmph पेक्षा जास्त असू नये.. ३. प्रत्येक वाहनामध्ये डॅशबोर्ड कॅमेरा बसविण्यात यावा. ४. प्रत्येक वाहन मालकाने आपल्या वाहनाच्या पाठीमागील दर्शनी भागात मोठ्या अक्षरात त्यांचा मोबाईल नंबर टाकावा, जेणेकरून चालक रैश ड्राइविंग करत असल्यास मालकाला संपर्क करता येईल. ५. वाहन चालकांनी वेग मर्यादा ओलांडू नये. ६. प्रत्येक वाहन चालकचा व मालकाचा मोबाईल नंबर, ड्राइविंग लायसन्स, आधारकार्ड यांची प्रत वाहतूक शाखेकडे जमा करावे. ७. विशेषत: चालक हा दारू पिऊन वाहन चालवणार नाही याबाबत मालकानी खात्री करावी. ८. वाहन चालक याचा कडून एखादा अपघात घडल्यास वाहन मालकाचीही त्यामध्ये जबाबदारी निश्चित करण्यात येईल. तसेच असोसिएशनचे अध्यक्ष यांनी केलेल्या सूचनांवर लवकरात लवकर अंमलबजावणी करणेबाबत मा. पोलिस आयुक्त सो यांनी संबंधित पोलिस अधिकारी यांना सूचना दिल्या. ...Read More
पोलीस दादा पोलीस दीदी उपक्रम
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर अंतर्गत पोलीस काका/ पोलीस दीदी हा उपक्रम चालू असून , सदर उपक्रमात सोलापूर शहरातील 07 पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांना संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस काका /पोलीस दीदी हे नेमण्यात आले असून ,सदर पोलीस काका व पोलीस दीदी हे शाळांना भेटी देऊन मुलांना गुड टच बॅड टच काय असते हे प्रात्यक्षिक करून दाखवतात तसेच त्याबाबतचे व्हिडिओ दाखवून मुलांना समजून सांगितले जाते. मोबाईलचे दुष्परिणाम, बालकांविरुद्धचे गुन्हे ,सायबर क्राईम, डायल 112, चाइल्ड हेल्पलाइन ,याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येते. सोलापूर शहरातील येणाऱ्या सर्व शाळांना पोलीस काका/ पोलीस दीदी यांचे नाव व मोबाईल नंबर देण्यात आले आहेत .तसेच मुलांना काही अडचणी आल्यास ते पोलीस काका /पोलीस दीदी यांच्याशी संपर्क साधू शकतात. दिनांक 22/01/2025 रोजी जोडभावी पेठ पोलीस ठाणे कडील पोलीस दीदी मपोशि/ 1676 मोरे यांनी जय भवानी प्रशाला येथे भेट देऊन सखी सावित्री मीटिंग करिता हजर असलेले महिला पालक यांना मुलांची काळजी कशी घ्यायची याबाबत मार्गदर्शन केले .सदर मीटिंग करिता 40 ते 45 पालक उपस्थित होते. तसेच एमआयडीसी पोलीस ठाणे अंतर्गत मपोशि/ 1215 बोरामणीकर यांनी नवाज उर्दू हायस्कूल एमआयडीसी या शाळेत भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .सदर वेळी 70 ते 75 विद्यार्थी उपस्थित होते. ...Read More
महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांचेसाठी Gender Sensitization व कामाचे ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध व निवारण) अधिनियम या दोन विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली.
दिनांक 06/01/2025 रोजी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर याठिकाणी महिला पोलीस अधिकारी व महिला पोलीस अंमलदार यांचेसाठी Gender Sensitization व कामाचे ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध व निवारण) अधिनियम या दोन विषयांवर कार्यशाळा आयोजित करण्यात आली. सदर कार्यशाळेचे उदघाटन मा. पोलीस आयुक्त एम. राजकुमार सर यांनी केले. सदर कार्यशाळेत Gender Sensitization या विषयावर मा. पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. दीपाली काळे मॅडम यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. तसेच कामाचे ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ (प्रतिबंध व निवारण) अधिनियम या विषयावर Adv. सरोजनी तमशेट्टी मॅडम यांनी मार्गदर्शन केले. सदर कार्यशाळेकरिता एकूण 110 महिला अधिकारी व अंमलदार उपस्थित होते ...Read More

घरपोडीचा एक व चोरीचे पाच असे एकूण सहा गुन्हे शहर गुन्हेशाखे कडून उघड..
शहर गुन्हे शाखेने घरफोडी चोरीसह चोरीचे एकुण ०६ गुन्हे उघडकीस आणून, एकूण ०३,९२,२९०/- रूपयेचा मुद्देमाल जप्त केला आहे. सदरची कामगिरी, मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर, श्री. अजित बोऱ्हाडे, पोलीस उप-आयुक्त, मुख्यालय, डॉ. दीपाली काळे, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, श्रीमती प्रांजली सोनवणे, सहायक पोलीस आयुक्त, गुन्हे, सुनिल दोरगे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली, सपोनि/विजय पाटील, सपोनि/जीवन निरगुडे, सपोनी/दादासो मोरे, सपोनि/संदीप पाटील व त्यांचे तपास पथकातील पोलीस अंमलदार यांनी केली आहे. ...Read More
सोलापूर शहरामध्ये सनसनाटी ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी
सोलापूर शहरामध्ये सनसनाटी ठरलेल्या आबा कांबळे खून खटल्याची सुनावणी जिल्हा न्यायालयात संपली असून शुक्रवारी विशेष न्यायाधीश संगीता शिंदे यांनी या खून प्रकरणातील सातही आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. सदर गुन्ह्याचे तपासी अधिकारी - पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) श्रीमती डॉ दिपाली काळे मॅडम व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप साहेब त्यांचे दप्तरी सहा.फौ.अल्ताफ शेख, पोह. 569 एस.टि.उबाळे.पोह. 826 एस.जी.राठोड. पोकॉ/1542 संजय साळुंखे यांनी केला असून वरील सर्वांना मा. पोलीस आयुक्त श्री. एम राज कुमार सो यांचे हस्ते बेस्ट कन्व्हीक्शन अवॉर्ड देवून सन्मानित करण्यात आले. ...Read More
Key To Change -Raise Responsible Boys हा नवीन उपक्रम
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर यांनी cactus foundation यांचे मदतीने Key To Change -Raise Responsible Boys हा नवीन उपक्रम ऑक्टोबर 2023 पासून सुरु केलेला आहे. आज दिनांक 16/05/24 रोजी सोलापूर शहरातील रिक्षाचालक यांचे साठी पोलीस आयुक्त कार्यालयात सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमासाठी मा. सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे )श्रीमती सोनावणे मॅडम, पोलीस निरीक्षक दराडे सर, सहाय्यक पोलीस निरीक्षक बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वाती येळे, पोलीस उप निरीक्षक पारडे, cactus foundation चे श्री. रामेश्वर इराबत्ती तसेच शहरातील एकूण 68 रिक्षाचालक उपस्थित होते. मा. सहाय्यक पोलीस आयुक्त(गुन्हे ) श्रीमती सोनावणे मॅडम यांनी तसेच श्री. रामेश्वर इराबत्ती यांनी उपस्थित रिक्षाचालक यांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये स्त्री -पुरुष समानता याबाबत तसेच महिलांबाबत पुरुषांचे मनात असलेल्या गैरसमजुती, नवीन पिढी चांगल्या विचारांची व चांगल्या संस्कार असलेली बनवणे असे महिला सुरक्षिततेच्या अनुषंगाने मार्गदर्शन करण्यात आले. Key to change -Raise Responsible Boys हा उपक्रम शहरातील शाळा, कॉलेज मध्ये पुरुष विध्यार्थ्यांसाठी देखील राबविण्यात येत आहे. ...Read More
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर आणि रोटरी ई क्लब ऑफ एलिट अँड फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व महिला प्रवर्तन करणाऱ्यांसाठी महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते.
दिनांक 18/03/2024 रोजी पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर, रोटरी ई क्लब ऑफ इलाईट व फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा यांचेतर्फे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेसाठी स्तन कॅन्सर स्क्रीनिंग तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. सदर शिबिरात मा. पोलीस उप आयुक्त डॉ. दिपाली काळे मॅडम यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सदर शिबिरात 30 महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांची तपासणी करण्यात आली. ...Read More
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर वतीने पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व महिला अंमलदार यांच्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर वतीने पोलीस आयुक्तालयातील महिला अधिकारी व महिला अंमलदार यांच्यासाठी महिला दिनाचे औचित्य साधून महिला दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून मा. श्री. एम. राज कुमार, पोलीस आयुक्त सोलापूर शहर हे उपस्थित होते. तसेच सदर कार्यक्रमास मा. श्री. अजित बो-हाडे, पोलीस उप आयुक्त (मुख्यालय), मा. श्रीमती डॉ. दिपाली काळे, पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा), मा. श्रीमती प्रांजली सोनवणे, सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे), प्रमुख पाहुणे म्हणून श्रीमती वासंती येळेगांवकर (आर्थिक सल्लागार) व श्रीमती सोनल पांचाळ असे हजर होते. सदर कार्यक्रमात अंशकालीन महिला कर्मचारी यांना साडी वाटप करण्यात आले व पोलीस आयुक्तालयातील उत्कृष्ट कामगिरी करणा-या महिला पोलीस अधिकारी व महिला अंमलदार यांना प्रशस्तीपत्रक देवून गौरविण्यात आले. सदर कार्यक्रमात मा. पोलीस आयुक्त सो यांनी मार्गदर्शन केले. प्रमुख पाहुणे श्रीमती वासंती येळेगांवकर (आर्थिक सल्लागार) यांनी महिलांनी आर्थिक गुंतवणूक कशी करावी व श्रीमती सोनल पांचाळ यांनी त्वचेची काळजी कशी घ्यावी या विषयावर मार्गदर्शन केले. ...Read More
ऑपरेशन मुस्कान व विशेष शोध मोहिम (Special Drive)
दिनांक 07/02/2024 ते 17/02/2024 या कालावधीत पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर वतीने मा. पोलीस आयुक्त श्री. एम. राज कुमार, डॉ. दिपाली काळे पोलीस उप आयुक्त (गुन्हे/विशा), प्रांजली सोनवणे सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे) यांचे मार्गदर्शनाखली पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर कडील अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष कडील पोलीस निरीक्षक महादेव राऊत व स्टाफ यांनी मिसिंग व्यक्तींचा शोध घेणेकामी ऑपरेशन मुस्कान तसेच विशेष शोध मोहिम (Special Drive) हा उपक्रम राबवून एकूण 92 हरविलेले व्यक्ती त्यामध्ये 49 पुरूष, 37 महिला व हरविलेल्या व्यक्ती सोबत गेलेले 06 बालक यांचा शोध घेवून त्यांना त्यांचे नातेवाईकांचे ताब्यात देवून हि मोहिम यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आली. ...Read More
गुन्हे शाखेकडून घरफोडी 3, मोटार सायकल चोरी 3 असे एकुण 6 गुन्हे उघडकीस
सोलापूर शहरामध्ये मागील काही दिवसात घरफोडी व मोटार सायकल चोरीचे प्रमाण वाढल्याने सपोनि संजय क्षिरसागर व पथकातील अंमलदार यांनी अभिलेखावरील पाहिजे व फरारी तसेच मालाविषयी गुन्हयातील आरोपीचा शोध घेतला असता, आरोपी नामे सचिन इरप्पा धोत्रे वय 20, रा. केकडे नगर, एमआयडीसी सोलापूर यास ताब्यात घेवून चौकशी केले असता, त्याने सोलापूर शहरातील तीन ठिकाणी बंद घराचे कडी कोयंडा तोडून त्या घरातून सोन्याचे दागिने चोरी केल्याचे कबुली दिली. सदर आरोपीताकडून एमआयडीसी पोलीस ठाणेकडील घरफोडीचे तीन गुन्हे उघडकीस आणून त्याचेकडून सुमारे 26 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने रक्कम रु. 95,000/- रु. व दुचाकी मोटार सायकलचे 3 गुन्हे उघडकीस आणून 75000/- रु. किं.चे 3 मोटार सायकल हस्तगत करुन एकुण 1,70,000/- रु.किं.चा मुददेमाल जप्त केला आहे. ...Read More
देशी बनावटीचे गावठी पिस्तुल व एक जिवंत काडतूस बाळगणारे दोन इसमास अटक
दिनांक 7/02/2021 रोजी आयुक्तालय हददीमध्ये मालाविषयी आरोपींचा शोध घेण्यासाठी तसेच अवैदय धंदे व अवैदय शस्त्र यावर कारवाई करण्याकामी गस्त करीत असतांना बातमीदाराकडून खात्रीशीर बातमी मिळाली की, हैद्राबाद रोडवरील हॉटेल स्वादसमोरील विरुध्द बाजूचे मुळेगांव क्रॉसरोड बाजूला एक राखाडी रंगाची चारचाकी कार मधून दोन इसम येत असतांना दिसले. सदर संशयित इसमांना जागीच ताब्यात घेवून त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता आरोपी नामे जब्बार कामतीकर व समद मखतुम शेख यांच्या ताब्यात एक देशी बनावटी गावठी पिस्तुल कंबरेस खोचलेल्या स्थितीत दिसली व त्यांच्या पॅन्टीच्या खिशात तीन जिवंत काडतुस मिळून आले. सदर पिस्तुल व काडतूस ही बेकायदा व विना परवाना बाळगल्याने सदर आरोपीतांविरुध्द एम.आय.डी.सी पोलीस ठाणे येथे गुरनं 77/2021 भारतीय हत्यार कायदा कलम 3/25 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...Read More
मोटार सायकल व मोबाईल चोरी करणा-या आरोपीस अटक करुन त्याचेकडून 5 मोटार सायकली व 4 मोबाईल हस्तगत
पोलीस आयुक्तालय सोलापूर शहर हददीत मोटार सायकल चोरीचे प्रमाणे वाढले होते त्यावर नियंत्रण ठेवून चोरीस गेलेले मोटार सायकल हस्तगत करणे व मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघड करणेबाबत मा. वरिष्ठांकडून सक्त सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेकडील सपोनि श्री. बंडगर व त्यांच्या पथकांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांनी दिनांक 5/06/2021 रोजी दयानंद कॉलेज चौकात सापळा रचून मिळालेल्या माहितीवरुन आरोपीत नामे विकास उर्फ विकी भिवा पवार रा. धोत्रेकर वस्ती हैद्राबाद रोड, सोलापूर यास ताब्यात घेवून पोलीस आयुक्तालयतील चार व सोलापूर ग्रामीण व सांगली येथील प्रत्येकी 1 गुन्हा व मोबाईल चोरीचे दोन गुन्हे उघडकीस आणले आहे. ...Read More
महिलांच्या गळ्यातील मंगळसुत्र जबरीने चोरणा-या आरोपीस गुन्हे शाखेकडुन अटक
दिनांक 13/09/2021 रोजी सोलापूर शहरात गौरी गणपती सणाच्या निमित्ताने महिला सोन्याचे दागिने घालून घराबाहेर पडल्या होत्या. या संधीचा फायदा घेवून महिल्याच्या गळयातील मंगळसुत्र हिसकावणा-या आरोपीतांचा शोध शहर गुन्हे शाखेचे सपोनि श्री. नंदकिशोर सोळुंके त्यांचे पथक घेत असतांना त्यांना खात्रीशीर बातमी मिळाल्याने आरोपी नामे 1. संतोष व्यंकट भोघीले रा. जिल्हा – बिदर कर्नाटक 2. श्रीनिवास जनार्दन माने रा. तालुका- उमरगा, जिल्हा उस्मानाबाद यांना ताब्यात घेवून त्यांच्याकडून एकुण 4 चैन स्नॅचिंग जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहे. गुन्हयातील गेला माल 5.8 तोळे सोन्याचे दागिने व बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल असा एकुण रक्कम रुपये 3,20000/- असा किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. ...Read More

01MOTOR-CYCLE THEFT, 05 HOUSE BREAKING THEFTS DETECTED BY CRIME BRANCH, SOLAPUR CITY
POLICE STATION:- CRIME BRANCH, SOLAPUR CITY DIST :- SOLAPUR CITY DATE OF WORK :- 15/12/2019 BRIEF FACT :- As offences of house breaking thefts happened in the Sol ...Read More